पवनने अजून एक तांब्या डोक्यावर रिकामा केला. त्या तांब्याने पवनची अंडरवेअर ओली केली. पवनने दोन्ही हातांनी अंडरवेअर खाली खेचली. इकडे पवनने साबण हातात घेतला आणि आपल्या अंगावर चोळू लागला. साबणाचा गंध न्हाणीघराच्या फटीतून बाहेर आला पण सुबोधच्या नाकाला तो जाणवला नाही. सुबोध पवनच्या शर्टाकडे बघत होता.
पवन खसखसून साबण लावून अंग रगडत होता. त्याने परत अंगावरून पाणी ओतले आणि सगळ्या साबणाचा फेस खाली ओघळला. त्याच्या गोल गरगरीत दंडावरून फेस घसरत मनगटावर आला नि खाली पडला. त्याच्या गोर्या बाहुवरील हिरव्या शिरा स्पष्ट दिसू लागल्या. त्याच गोर्या हातानी पवनने आपला लवडा धरला आणि पाण्याने चोळू लागला. पांढर्या फेसातून काळा लंड डोकावू लागला. कधी गोट्या रगडत तर जांघेतून हात पाठी पुढे केला. स्वतःच्या मांड्यावरून तो आपले हात फिरवत फेस खाली सारत होता. परत पाण्याचा तांब्या सरळ लवड्यावर ओतला.
मावळतिच्या ऊन्हात दोन गोट्यावर ओनवा झालेला लवडा चमकत होता. त्याच्या गुलाबी सुपाड्यावर असलेली थेंबाची रांग काही पुढे सरकत नव्हती. तांब्यावर तांबे रिकामे होत गेले आणि पवनची आंघोळ आटपत आली.
निळ्या पांढर्या आडव्या पट्ट्या असलेला टॉवेल कमरेला करकचून गुंडाळून पवन बाहेर आला. त्याने एका हाताने आपले केस झाडले. त्याचे शिंतोडे चारी बाजूला उडाले.
“आता कस ताज वाटतं”. पवन म्हणला
“आता जरा बरा दिसतोयस” सुबोध म्हणला.
पवनने कपडे घातले. सुबोध तोपर्यंत पवनला पाहत होता.
“जेवायला बाहेर जायचं की रूममध्ये आणू मी काही” पवनने विचारलं.
“इथे नको बाहेरच जाऊ”.
ते दोघे त्याच हॉटेलमध्ये जेवायला गेले. अंगणात टेबल खुर्च्या मांडून हॉटेल मालकाने तशी ग्राहकांसाठी सोय केली होती. त्या दोघांशिवाय अजून चार पाच माणस देखील होती तिथे. हवेत गारवा होता. जेवण झालं आणि ते दोघे परत खोलीत आले. दिवसभरच्या थकवा दोघांच्या ही हालचालीत जाणवत होता. पवनने सुबोधला त्याची औषध दिली.
“तू बेड वर नीट झोप मी इथे सोफ्यावर पडेन” पवन म्हणला.
“अरे नको तिथे अडचण होईल आपण झोपू एकत्र एका बेडवर” सुबोध बेडवरून सरकत म्हणला.
“अरे एका रात्रीचा प्रश्न आहे उद्या आपण आपल्या नव्या घरी असू.”
“म्हणजे?”
“आहे एक सरप्राईज कळेन उद्या तुला. झोप आता.” पवनने दिवे घालवले आणि एक कुशीवर सोफ्यावर आडवा झाला. सुबोध पण बेडवर पडला.
रस्त्यावरची धूळ उडवत पवनची गाडी गावामधून चालली होती. सगळी लोकं त्या गाडीकडे पाहत होते आणि कुजबुजत होते.
“ह्यांनीच घेतलाय वाटत त्यो बंगला” कोणीतरी विचारलं.
“व्हय ह्योच नवीन मालक हाय वाटत” कुणाचा तरी आवाज आला.
“तुम्हाला काय र माहीत कोण राहतेय आन कोण नाय?” एकाने शंका विचारली.
“रघुनी सांगितलंय एक नवीन सायेब येणार हाय. दोन आठवड झालं चार-पाच माणसं घिऊन गेलाय तिकडं बंगला झाडायला” एक म्हातारा खोकत म्हणाला.
गाव सोडून गाडी पुढे गेली एका ओसाड जागेवरून धावू लागली. सुबोध गाडीच्या पुढच्या खिडकीतून पाहत होता समोर जंगलासारखं काही तरी दिसत होतं. थोड्याच वेळात रस्त्याला लागून एक दगडी भिंड सुरू लागली. बंगला जवळ आला. पवनने हॉर्न वाजवताच एका माणसाने प्रवेशद्वार उघडून दिल. लोखंडाच गंजलेल ते प्रवेशद्वार मोठा आवाज करत मागे सरकल. पवनने सुबोधकडे पाहून मोठी स्माईल दिली. त्याचे दात चमकले.
“आजपासून आपण इथे राहणार” पवनने सुबोधला सांगितल.
आत शिरताच ते घर दिसल. दोन मजली मोठं घर होत ते. त्याच्या बाजूला हिरव्यागार गवताची वाढ झाली होती. प्रवेशद्वारापासून एक वाट त्या घराच्या दरवाजापर्यंत जात होती. त्या वाटेवर गवत नव्हते फक्त वेगवेगळ्या रंगाचे दगड होते. खूपच जून वाटत होतं ते घर. सुबोध निट त्या घराला निहाळू लागला. सफेद रंग आणि हिरवट झालेली कौल अस काहीस होत ते घर. घराचं बांधकाम भारतीय शैलीतील नव्हतं.
घराचा जास्तकरून भाग हा लाकडी होता. ते घर एका मानवी चेहर्या सारखं वाटत होतं. असा चेहरा जो वर्षानुवर्षे कोणाची तरी वाट पाहत आहे. चौकोनी मोठा दरवाजा जणू त्याच तोंड होत ते तोंड कोणाचा तरी घास घ्यायला भुकेल होत असे वाटत होतं. नजर वर करताच दुसर्या मजल्यावरील खिडक्या दिसत.
ते त्या घरचे डोळे. कोणाची तरी वाट पाहत असलेले डोळे. जसे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे होतात तशी त्या खिडक्यांची अवस्था होती. पण खिडकीची काच मात्र चमकत होती. आपल्या माणसाला पाहून जसे एखाद्याचे डोळे चमकतात तसे. ते दोघे ही कार बाजूला लावून उतरले.
“या सायेब” घरातून एक वयस्कर माणूस बाहेर आला आणि त्यांना आत बोलवू लागला. रघु होता तो.
पवन आणि सुबोध आत गेले. पवनने त्या माणसाच्या मदतीने सुबोधला घरात घेतला. सुरवातीला पायर्या असल्यामुळे व्हीलचेअर नीट आत जात नव्हती.
“ह्या पायर्या बदलाव्या लागतील.” पवन चौफेर नजर फिरवत म्हणाला.
“जी करू लवकरच, आत या.” रघु कमरेत वाकून म्हणला.
आत जाताच त्यांना ते दिवाणखान्यात आले. आत जाताच वातावरणाच्या एका थरातून दुसर्या थरात गेल्या सारखं वाटलं दोघांना. ते एकमेकांना पाहू लागले. प्रशस्त आणि स्वच्छ असं मोठं घर होत आतून ते. डाव्या बाजूला स्वयंपाकघर आणि उजवीकडे भिंतीला लागून वर जाणार जिना होता. वर शयनगृह होते. जिन्याखाली एक दरवाजा होता जो खाली तळघरात जात होता. खुपश्या गोष्टी जुन्या वाटत होत्या.
घरात भरीव अस जड लाकडी सामान होत. खुर्च्या, सोफा, मेज सगळं उत्तम प्रकारच्या लाकडापासून बनवलं गेलं होतं आणि त्यावर भरीव अस नक्षीकाम सुद्धा होत. नुकत्याच त्या वस्तू साफ केल्या गेल्या होत्या ते जाणवत होतं. इकडे पवन त्या म्हातार्या माणसासोबत काहीतरी बोलत होता. सुबोध व्हीलचेअरवरून घर पाहू लागला. सुबोधला दिवाणखान्यात कोपर्यात घरातच शेकोटी करायची जागा बनवलेली दिसली. भिंतीला छोटा खोल चौकोन आणि त्याला वर चिमणी होती. पण ती जागा खूप स्वच्छ होती. खूप वर्षे कोणी तिथे शेकोटी पेटवली नसणार.
दिवाणखान्याच्या भिंतीला लागून अजून दोन खोल्या, एक न्हाणीघर आणि एक मागच्या बगीच्यासाठी दरवाजा होता. बाकीच्या दरवाजपेक्षा तो दरवाजा वेगळा होता. खूप वर्तुळ कोरले गेले होते त्यावर. एकमेकात मिसळले वर्तुळ होते ते. तेवढा दरवाजा मात्र खूप धुळीने माखलेला दिसत होता. तेवढ्याच सुबोधची नजर जिण्याला लागून असलेल्या भिंतीवर टांगलेल्या चित्रांकडे गेली.
तीन चित्रे हाती भिंतीवर. त्यापैकी सर्वांत खाली असलेलं तिसरं चित्र अस्पष्ट होत. धूसर अस होत. नक्की कोण आहे त्या चित्रात नीट दिसत नव्हत. तो पोशाख भारतीय वाटत होता. कारण बाकीच्या दोन्ही चित्रांमध्ये विदेशी पोशाख होता.
“हे कोण आहेत?” सुबोधने चित्रांकडे बोट दाखवत विचारले.
“ह्यो गोरा सायेब आणि ही त्याची बायको. हे घर त्यांनीच बांधलं” म्हातारा रघु म्हणाला.
“आणि हे तिसरं कोणाचं? चित्र नीट साफ नाही केलं का? काही दिसत नाही ते” सुबोधने आपली शंका विचारली
“ते तसंच हाय, काढणार्यांन तसंच काढलंय. ती गोर्या सायेबाची रखेल व्हती.” रघु आवाज जड करून म्हणाला.
तेवढ्यात जिन्यावरून काही माणसे उतरत आली.
“तुम्ही सांगितलं तस समदं करून ठिवलंय बघा. वरच्या काही खोल्या राहिल्यात नीट करायच्या फक्त. ह्यो टिन्या ह्यो तुमच्याकड सयपकाला इत जाईल.” रघु टिन्याकडे नजर टाकत म्हणाला.
टिन्या एक पंचविशीचा गावतालाच मुलगा होता.
“चालेल” पवन रघु आणि त्याच्या माणसांना कामाचे पैसे देत म्हणला.
“फक्त एक अट हाय बघा” टिन्या म्हणला.
“कसली अट?” पवनने मान खाली ठेऊन नजर वर करत विचारलं.
“म्या इऊन सयपक करून जाइल, पण मावळायच्या आदी मला घरी जायचं असत.”
” पण आम्ही रात्री नऊ-साडेनऊला जेवतो. निदान आठ पर्यन्त तरी थांबायला हवं तुला.”
“आपल्याला नाय जमणार बुआ मग!” तो हात टाकत म्हणाला. “ह्यांना काय माहीत नाय वाटत या घराबद्दल” आपल्या साथीदारांकडे पाहत तो म्हणाला.
“माहीत आहे, लोक म्हणतात या घरात भूत आहे हेच ना?” पवन बेफिकिरीने म्हणाला.
“भुताच नाय माहीत पण हे घर फसवं हाय!” त्यातला एक उत्साहाने म्हणाला.
“म्हणजे?” सुबोधने विचारलं.
“ते म्हंजी असं की…”
“बास आम्हाला तुझी अट मंजुर आहे ये उद्यापासून.” पवन त्याला थांबवत म्हणाला. पवनने सुबोधच्या थकलेल्या चेहर्याकडे पाहिलं होत.
“बरं” टिन्या बोलला.
“आणि एक ईनंती हुती बघा सायेब”. म्हातारा रघु काळजीने म्हणाला. “ज्या खिडक्यातून घरचीमागची बाजू दिसती आणि त्यो दरवाजा आणि खिडक्या उघडू नका, त्याला हात बी लावू नका. घराच्या पाठी जाऊ नका.”
“मग काय सगळे दरवाजे खिडक्या बंद करून राहू का?” पवन फटकळ पणे म्हणाला.
“नाय! घराची मागची बाजू दिसलं अश्या खिडक्या झाकल्यात आमी त्या आणि त्यो दरवाजा उघडू नका. तसं बी घरच्या मग काय भी नाय नुसती झाडी हाय!” रघु त्या धुळीने माखलेल्या दरवाजाकडे इशारा करत म्हणाला. सगळ्यांनी त्या दरवाजाकडे पाहिलं. तो दरवाजा या चमकणार्या दिवाणखान्यात तो शोभत नव्हता.
“अजून काय?” पवन वैतागून म्हणाला. त्याला ही माणसे केव्हा या घरातून जातायत अस झालं होतं. उगाच सुबोध समोर हे भूत-आत्मा असले विषय नको म्हणून.
“काय नाय निघतो आम्ही. रामराम. काय लागलं तर सांगा.” रघुने निरोप घेतला.
“हूं! काही लागलं तर कळवतो” पवन म्हणाला.
म्हातारा रघु गेला आता घरात फक्त पवन आणि सुबोध होते.
रात्र झाली पवन आणि सुबोध जेवायला बसले होते.
“ते लोक काय बोलत होते या घराबद्दल? आणि तू एवढं जुनं घर का घेतलंस?” सुबोधने विचारलं
“काही ही बोलतात ही गावची माणसं अडाणी आहेत तू लक्ष नको देऊस. हे घर फक्त दोन करोडमध्ये मिळायल.”
“काय?” सुबोध घास चावत म्हणाला.
“हो. काय माहीत काय झालं ह्या घराच्या जुन्या मालकाने हे विकायला काढलं. तो सुरवातीला तीन बोलत होता पण मी त्याला दोन करोड वर आणलं. एवढं चांगलं घर ते पण सगळ्या आधुनिक सोईसुविधा असलेले पण गावकर्यांच्या गोष्टी ऐकून कोणी घ्यायला तयार नाही. मग मी विकत घेतल हे घर. तुला आवडलं ना?”
“हो खूप छान आहे. पाय बरे झाले की मी वर पण पाहून येईल.” सुबोध वर बघत म्हणाला.
“मी आहे आता तू लवकरच बरा होशील.” पवनने दिलासा दिला.
“सुबोध, मला माफ कर मी तुझ्या आजारपणात सोबत नव्हतो.”
“मला माहित आहे सगळं.” सुबोध संथपणे म्हणाला.
